
भारतातील दर्जेदार कृषी उत्पादनांची सुलभता वाढविण्यास चालना देणे.
पीएम मोदींच्या ‘Vocal for Local’ आणि ‘आत्मनिर्भर कृषी’ व्हिजनच्या दिशेने पावले
6 नोव्हेंबर, 2020, नवी दिल्ली: :इफको ची ई-कॉमर्स शाखा www.iffcobazar.in, हे एक शेतकर्यांच्या आवश्यकता पूर्ण करणारे समर्पित पोर्टल असून एसबीआय यूनो (SBI YONO) कृषी सह त्याचे एकत्रीकरण जाहीर करण्यात आले आहे. यामुळे लाखो भारतीय शेतकर्यांसाठी विविध प्रकारची कृषी उत्पादने उपलब्ध होतील याची त्यांना खात्री होईल. एसबीआय यूनो (SBI YONO) चे त्रासमुक्त पेमेंट पोर्टल आणि इफको ची दर्जेदार उत्पादने हे एक संयोजन आहे, ज्याचा उद्धेश या विभागातील डिजिटल विक्री वाढवणे हा आहे.
www.iffcobazar.in हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारे कृषी आधारित ई-कॉमर्स पोर्टल आहे, ज्याची जाहिरात देशातील सर्वात मोठी खत उत्पादक कंपनी इफको (IFFCO) द्वारे करण्यात आली आहे. 12 भारतीय भाषांमध्ये हे पोर्टल उपलब्ध आहे आणि संपूर्ण भारतभर मोफत होम डिलिव्हरी देण्याचे आश्वासन देते. भारतातील 26 राज्यामध्ये ह्यांचे 1200 पेक्षा अधिक स्टोर्स आहेत आणि या स्टोर्स व्यतिरिक्त त्यांनी विशेष खते, सेंद्रिय कृषी निविष्ठा, बियाणे, कृषी रसायने, कृषी यंत्रे यासह विविध प्रकारची उत्पादने पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहेत.
या भागीदारीबद्दल बोलताना इफकोचे एमडी डॉ. अवस्थी म्हणाले की, “ इफको (IFFCO) आणि एसबीआय (SBI) ह्या भारतातील दोन सर्वात जुन्या व्यावसायिक संस्था आहेत. आमच्या नावामध्ये “आय” (I) हे अक्षर जे भारताचे (INDIA) चे प्रतिनिधित्व करते त्याने व त्यातील भावनेने आम्ही एकत्रितपणे बांधले गेले आहोत, मला सांगायला अभिमान वाटतो की या एकीकरणाद्वारे, दोन गौरवान्वित 'भारतीय' संस्था भारतीय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांच्या संयुक्त सहकार्याने काम करू शकतात.” ते पुढे म्हणाले की, “इफको गेल्या 50 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. iffcobazar.in हे एक व्यासपीठ आहे जे शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने जोडेल आणि सेवा देईल. डिजिटल फर्स्ट आणि शेतकरी केंद्रित दृष्टीकोनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे जे आपल्या माननीय पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एक पाउल पुढे टाकण्यासारखे आहे. पोर्टलद्वारे, शेतकरी केवळ सर्वोत्तम दर्जाची विनाअनुदानित खते आणि इतर कृषी संबंधी कच्चा माल ऑर्डर करू शकत नाहीत, तर शेतकरी मंच आणि समर्पित हेल्पलाइनद्वारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळवू शकतात. “एसबीआय भारतातील वित्तीय संस्था म्हणून प्रशंसनीय काम करत आहे आणि भारतातील ग्रामीण भागापर्यंत तिची असलेली पोहोच अतुलनीय आहे. सोबतच मला विश्वास आहे की एसबीआय यूनो (SBI YONO) च्या माध्यमातून, iffcobazar.in हे पोर्टल संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल”, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
श्री योगेंद्र कुमार, विपणन संचालक, इफको पुढे म्हणाले की, "शेतकऱ्यांसाठी वित्त आणि खते हे दोन महत्त्वाचे इनपुट आहेत. एसबीआय यूनो (SBI YONO) आणि iffcobazar.in ह्या त्यांच्या संबंधित क्षेत्रातील दोन सर्वात मोठ्या भारतीय संस्था असून त्यांच्यातील भागीदारीमुळे त्या शेतकर्यांना उत्तम दर्जाचे कृषी विषयक इनपुट्स घरबसल्या प्रदान करण्यासाठी सहयोग करू शकतात.” ते पुढे असे ही म्हणाले की, "या सहकार्यामुळे IFFCO BAZAR ला यूनो (YONO) च्या 30 दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत ग्राहकांपर्यंत, ज्यापैकी मोठा हिस्सा शेतकऱ्यांचा असल्याने त्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. भागीदारीद्वारे, आम्ही ग्रामीण भारतामध्ये एक विश्वासार्ह इकोसिस्टम तयार करण्यासाठी मजबूत ब्रँड इक्विटीचा लाभ घेऊ शकतो जे शेवटी शेतकऱ्यांसाठी इनपुट खर्च कमी करण्यास मदत करेल."
इफको विषयी
IFFCO ही जगातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थांपैकी एक आहे आणि खते उत्पादन, विक्री आणि वितरणामध्ये गुंतलेल्या भारतीय सहकारी संस्थांच्या मालकीची आहे. 1967 मध्ये केवळ 57 सहकारी संस्थांसह स्थापन केलेले, हे आज सामान्य विमा ते अन्न प्रक्रिया आणि ओमान, जॉर्डन, दुबई आणि सेनेगलमधील विविध व्यावसायिक हितसंबंध असलेल्या 35,000 सहकारी संस्थांचे एकत्रीकरण आहे. भारतात पाच खत निर्मिती सुविधा आणि संपूर्ण भारतातील विस्तृत विपणन नेटवर्कसह, फॉस्फेटिक खतांची प्रत्येक तिसरी बैग आणि भारतात विक्री केलेल्या युरियाची प्रत्येक पाचवी बैग इफको (IFFCO) द्वारे हाताळली जाते. 2018-19 या वर्षात IFFCO ने 8.14 दशलक्ष टन खतांचे उत्पादन केले आणि सुमारे 11.55 दशलक्ष टन शेतकऱ्यांना विकले. परंतु इफकोच्या सर्वसमावेशक व्यवसाय मॉडेलबद्दल धन्यवाद, भारतीय शेतकरी समुदाय आणि भारतीय शेतीच्या सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासावर नेहमीच भर दिला गेला आहे. CORDETT, IFFDC आणि IKST सारखे अनेक विकास उपक्रम या दिशेने विशेषतः कार्य करतात.