
शहरी बागकामाची इच्छा असणाऱ्या उत्साही लोकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी
नवी दिल्ली, जून 2020: इफको (IFFCO) - इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड, अॅक्वा जीटी (Aqua GT) ही जगातील सर्वात मोठी सहकारी कंपनी शहरी बागकाम क्षेत्रात उतरली आहे. शहरातील उत्साही लोकांना मदत करण्यासाठी, त्यांनी ‘इफको अर्बन गार्डन्स’ या ब्रँड च्या नावाखाली उपयुक्त, प्रभावी आणि वापरण्यास सुलभ अशी विशेष शहरी बागकाम उत्पादन श्रेणी सादर केली आहे.
ही उत्पादने अॅक्वा अॅग्री प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड द्वारे तामिळनाडूच्या मनामदुराई येथील प्रगत R&D फॅसीलिटी (संशोधन आणि विकास सुविधा) मध्ये संशोधन आणि विकसित केली जातात. ही फॅसीलिटी डीएसआयआर (DSIR) द्वारे मान्यताप्राप्त आहे आणि ती भारतीय विज्ञान प्रणाली (इंडियन सायंस सिस्टम) सोबत मिळून काम करते. ही शहरी उत्पादने त्याच्या सहाय्यक कंपनी अॅक्वा अॅग्री ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित आणि विक्री केली जातात.
ही उत्पादने शहरी बाग वापरकर्त्यांसाठी प्रभावीपणे सोपे उपाय प्रदान करतात जे त्यांच्या झाडांच्या आरोग्याची काळजी घेतात. सुरुवातीच्या ऑफरमध्ये सात पर्यावरणपूरक उत्पादनांचा समावेश आहे आणि लवकरच आणखी अनेक उत्पादने जोडली जातील. उत्पादनांबद्दल अधिक माहिती www.aquagt.in वर मिळू शकेल. ही उत्पादने न्यूट्री रिच (पोषक घटकांनी समृद्ध) आहेत जसे सीवीड फोर्टिफाइड गांडूळखत (वर्मीकंपोस्ट), प्रोटेक्ट + - कडुनिंब आणि जैव-कीटकनाशकांवर आधारित वनस्पती संरक्षण, मैजीक सॉंइल - सर्व उद्देशासाठी कुंडीची माती (पॉटिंग सॉंइल), सी सीक्रेट – ग्रोथ अँड प्लांट स्ट्रेस टॉलरंस इन्हान्सर, ग्रीन डायट –इंस्टंट प्लांट फूड, लाइफ प्रो- कट फ्लॉवर लाइफ एक्स्टेंडर, बोकाशी – किचन वेस्ट डिकम्पोजर.
या विकासाबद्दल, बोलतांना डॉ यू एस अवस्थी, एमडी, इफको म्हणाले की, “ 52 वर्षांहून अधिक काळ भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण केल्यानंतर, आता आमचे सहयोगी, अॅक्वा जीटी, शहरी ग्राहकांच्या बागायती गरजा पूर्ण करून त्यांच्याशी संलग्नता निर्माण करत आहे. यामुळे शहरी भागात इफकोच्या गो ग्रीन मोहिमेला चालना मिळणार आहे. ते पुढे म्हणाले की, अर्बन गार्डनिंग उत्पादनांच्या या नवीन श्रेणीमुळे आम्ही आनंदी आणि उत्साहित आहोत. शहरी लोकसंख्येमध्ये बागकामाकडे आवड वाढत आहे आणि ते त्यांच्या बागांसाठी तयार केलेल्या मातीच्या पोषक तत्वांच्या दृष्टीने विश्वासार्ह आणि प्रमाणित इनपुट शोधत आहेत.”
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की भारतातील बागेच्या उत्पादनांची बाजारपेठ सुमारे 10,000 कोटी रुपये आहे, एकूण बाजारातील प्लांट केअर उत्पादनांचा 50% वाटा झाडांना आणि सुमारे 15% वाटा हा पॉट्स (कुंड्या), साधने (टूल्स) आणि गार्डन डेकोर यामध्ये विभागलेले आहेत.
अॅक्वा अॅग्रीचे एमडी श्री अभिराम सेठ सांगताना म्हणाले, “ही नवीन उत्पादने IFFCO च्या नव्याने सुरू झालेल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म www.iffcobazar.in आणि NCR प्रदेशातील निवडक नर्सरींवर ऑनलाइन उपलब्ध आहेत. आम्ही देशभरातील विविध माध्यमांद्वारे आमची उपलब्धता वाढवू. तांत्रिक आणि वितरण क्षेत्रात एकत्रितपणे काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. “भविष्यात आम्ही एंड युजर च्या विशिष्ट गरजा पूर्ण करणारी अधिक विशेष उत्पादने आणि बागकामात उपयोगात येणारे सामान विकसित करणे आम्ही सुरूच ठेवू”.
तांत्रिक माहितीसाठी
+91-96678-98069 वर संपर्क साधा,
ईमेल: info@aquagt.in
द्वारे जारी केलेले:
मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स,
अॅक्वा जीटी (Aqua GT)