
-
Principal Activity
समुद्री शैवाल (सिव्हिड) आधारित उत्पादनांचे उत्पादन
-
कॉर्पोरेट ऑफिस
तामिळनाडू
-
IFFCO's शेअरहोल्डिंग
50%
शेती/कृषीसाठी समुद्री शैवाल (सिवीड)
कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सिवीड आधारित सेंद्रिय उत्पादनांची निर्मिती अॅक्वाअॅग्री प्रोसेसिंग प्रा. लिमिटेड (Aquagri) करते. इफको (IFFCO) ने 2017 मध्ये आपल्या संपूर्ण मालकीची सहायक कंपनी IFFCO eBazar लिमिटेड मार्फत अॅक्वाअॅग्री प्रोसेसिंग प्रा.लिमिटेड मध्ये 50% स्टेक (शेअरहोल्डिंग) विकत घेतले.
तामिळनाडूच्या मनमदुराई येथे अॅक्वाअॅग्री ची प्रोसेसिंग फैसिलिटी असून ती या प्रदेशातील स्थानिक स्वयं सहायता समूहा (सेल्फ हेल्प ग्रुप) ला समुद्री शैवाल शेतीमध्ये समाविष्ट करून घेते. भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची (काउंसील ऑफ साइन्टीफ़िक अँड इंडस्ट्रीअल रिसर्च) (CSIR) ची घटक प्रयोगशाळा सीव्हीड अर्क निर्मिती तंत्रज्ञान सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CSMCRI) कडून परवानाकृत आहे.
इफको (IFFCO) शेती आणि घरगुती बागायती खरेदीदारांना लक्षात घेऊन पिकांच्या पोषण आणि संरक्षणासाठी अनेक सेंद्रिय नॉन-केमिकल उत्पादनांची श्रेणी ऑफर करण्याची योजना आखत आहे.