
जनजागृती मोहीम
माती वाचवा
शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतींसाठी मातीचे पुनरुज्जीवन आणि पीक उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून माती वाचवा मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम माती परीक्षण, सुधारणा आणि संवर्धन, पोषक तत्वांचा संतुलित आणि एकात्मिक वापर, जलस्रोत विकास आणि संवर्धन, पीक पद्धतीमध्ये कडधान्यांचा समावेश, पीक विविधीकरण, कृषी यांत्रिकीकरण इत्यादींना प्रोत्साहन देते.
जनजागृती चळवळीव्यतिरिक्त, बायोगॅस युनिट्स, एमआयएस(MIS) - ठिबक सिंचन प्रणाली, स्प्रिंकलर सिस्टम , प्लास्टिक मल्चिंग आणि संबंधित शेती यंत्रसामग्री यांसारख्या कृषी यांत्रिकीकरण तंत्रज्ञानाच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील दिली जाते.
मोहिमेअंतर्गत, इफ्को ने - मोअर क्रॉप पर ड्रॉप - ही चळवळ लोकप्रिय केली जी विकास आणि जलस्रोतांचे अधिक कार्यक्षम व्यवस्थापन, भूजल पातळी सुधारणे आणि सिंचनाखाली अतिरिक्त क्षेत्र आणण्यासाठी मार्गदर्शन करते.
या मोहिमेचा परिणाम सर्व पिकांमध्ये 15 - 25% च्या सरासरी उत्पादनात वाढ, मातीचे आरोग्य सुधारणे आणि सुधारित आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसह मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे.