


सल्फर बेंटोनाइट
सल्फर बेंटोनाइट हे शुद्ध सल्फर आणि बेंटोनाइट क्ले (चिकणमाती) चे मिश्रण आहे. हे दुय्यम पोषक तत्व म्हणून आणि क्षारीय मातीच्या समस्या दूर करण्यासाठी देखील वापरले जाते. सल्फर हे 17 आवश्यक वनस्पती पोषक घटकांपैकी एक आहे आणि आवश्यक एन्झाइम आणि वनस्पती यांची निर्मिती करण्यास मदत करते.
मुख्य फायदे
पिके हिरवी ठेवते
विशेषतः तेलबिया पिकांमध्ये पीक उत्पादन वाढते
एंजाइमसाठी आवश्यक

सल्फर बेंटोनाईट कसे वापरावे
खतांचा वापर पीकचक्राची जागा, प्रमाण आणि वेळ लक्षात घेऊन करावा. सल्फर बेंटोनाईट पेरणीच्या वेळी किंवा उभ्या पिकांमध्ये थेट जमिनीत टाकावे. तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी एकरी 12-15KG आणि तृणधान्य पिकांसाठी एकरी 8-10kg/ मात्रा मध्ये वापरावे तर फळे आणि भाजीपाला पिकांसाठी एकरी 10-12kg/ चा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.